
संकेश्वर (प्रतिनिधी) : मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. पवित्र रमजानचे रोजे, तरहाबी नमाज आणि पाच-सहा दिवसांत होणाऱ्या रमजान ईद (ईद-उल-फित्रची ) जोरदार तयारी चाललेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पडून करता आलेली नाहीयं. यंदा रमजान ईदची नमाज ईदगाहवर पडून करता येणार आहे. त्यामुळे येथील अंकले रस्ता महेदिया जमातच्या ईदगाहची स्वच्छता मोहिम चाललेली पहावयास मिळाली. ईदगाहची रंगरंगोटी करण्याबरोबर ईदगाहचे टाईल्स पाण्याने स्वच्छ धुवून चकाचक करण्यात आले आहे. ईदची नमाज ईदगाहवर पठन करण्याची संधी अल्लाह कृपेने लाभल्याने मुस्लिम समाज बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. येथील मेहदिया जमातच्या ईदगाहची स्वच्छता करण्याचे कार्य संकेश्वर पालिकेचे कामगारांनी महेदिया यंग कमिटीच्या सदस्यांनी केले आहे. ईदगाह स्वच्छतेचे काम करुन दिले बदल पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी, आणि पालिका कामगारांचे विशेष अभिनंदन महेदिया जमातचे अध्यक्ष हाजी मैनोद्दिन कारेकाजी, संकेश्वर काॅंग्रेस अल्पसंख्याक घटकचे अध्यक्ष जाकीर मोमीन यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta