Monday , September 21 2026
Breaking News

असहाय्य जखमी वासरावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपचार

Spread the love


बेळगाव : बेळगाव शहरातील काकतीवेस रोड येथे रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका असहाय्य वासराला रुग्णालयात नेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले.
काकतीवेस रोड येथे आज बुधवारी सकाळी गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत रस्ताकडेला पडलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांचे मित्र रोहन घोडके व विनायक अरकेरी यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी त्या वासराला नजीक जाऊन तपासले असता त्याच्या पायाला जखमा झाल्याचे आणि त्यामुळे ते आजारी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा गणेश काळे आणि त्यांच्या मित्रांनी त्या वासराला त्वरित पशु रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचाराची व्यवस्था केली.
डॉक्टरांनी उपचारांती लवकरच संबंधित वासरू तंदुरुस्त व निरोगी होईल असे सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांच्या मित्रांनी या पद्धतीने असहाय्य जखमी वासराला दिलासा दिल्याबद्दल पशुप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *