Monday , September 21 2026
Breaking News

भिवशीतील दलित पूरग्रस्तावर अन्याय..

Spread the love
डॉ. आंबेडकर विचार मंच: जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
 निपाणी (वार्ता) : पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त व बेघर झालेली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी ए. बी. व सी श्रेणीमध्ये त्याची विभागणी केली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून सी श्रेणीमध्ये  जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. हा दलित समाजावर अन्याय झालेला असून हा कधीही सहन केला जाणार नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांच्याकडे डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे देण्यात आले.
गतवर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे दिवशी गावातील अनेक दलित समाजाचे घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल खात्यातर्फे अशा घरांचा सर्वे करण्यात आला. पण त्यामध्ये वर्गवारी केल्याने अनेक नुकसानग्रस्त कुटुंबियांवर अन्याय झाला आहे. अजूनही अनेकजण उघड्यावरच वास्तव्यास आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांचा सर्वे पुन्हा करून दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून या अन्यायग्रस्त पूरग्रस्तांना न्याय देण्याची गवाही दिली.
 यावेळी डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे दलित नेते मल्लेश चौगुले, अमित शिंदे, रमेश कांबळे, बबन भोसले, प्रवीण सौंदलगे, अशोक लाखे, किशन दावणे, राजीव कांबळे, रतन पोळ, साजन घस्ते, प्रणित घस्ते, सागर कांबळे दीपक शेवाळे, राहुल भोसले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *