Monday , April 20 2026
Breaking News

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर पुरस्कार

Spread the love
रावसाहेब पाटील यांची माहिती: बापूसाहेब बोरगाव यांना मरणोत्तर जीवन गौरव 
निपाणी (वार्ता) : सांगलीत 14 व 15 मे रोजी होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना तर जीवनगौरव पुरस्कार बापूसाहेब बोरगावे (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला. बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. दोन्ही पुरस्कारासाठी रोख 1 लाख रुपये व मानचिन्ह देण्यात येणार आहे.
रावसाहेब पाटील म्हणाले बी. पाटील समाजसेवा पुरस्कार  प्रा. आप्पासाहेब मासुले, क. डिग्रज, पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवडी समाजसेवा पुरस्कार छाया पाटील, कामेरी (वाळवा) आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार डॉ. सी. पी. कुसुमा, श्रवणबेळगोळ आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार प्रा. श्रीधर  हेरवाडे, कोल्हापूर आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार
मोहन शास्त्री, म्हैसूर डॉ.डी.एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार
 डॉ. विजय पाटील सोलापूर श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सह. आदर्श संस्था पुरस्कार सिद्धराज सह.शेती पाणीपुरवठा संस्था मर्या. क.एकंद प्रभातकार वा.रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार कुंतिनाथ  कलमणी, बेळगाव प्रा. डी. ए. पाटील (सर) आदर्श शिक्षक पुरस्कार अरूणा चौगुले, मौजे डिग्रज बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस अवॉर्ड डॉ. अजित मुरगुंडे, बेंगलोर स्व. सुलोचना सि. चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार
काव्यश्री नलवडे, जयसिंगपूर प्राचार्य जी.के. पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार राजकुमार चौगुले, दानोळी श्रमणरत्न प.पू.आचार्यश्री 108 सुबलसागर महाराज त्यागी सेवा श्रावक पुरस्कार श्री. सुहास पाटील, बोलवाड श्रीमती धन्नाबाई गंगवाल त्यागी सेवा महिला पुरस्कार शोभा सुंदरलालजी पाटणी, जालना, डॉ.एन.जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार
दादासाहेब पाटील, दुधगाव प्रेमाबाई जैन आदर्श माता पुरस्कार आक्काताई बेळकुडे, जयसिंगपूर, चंपतराय अजमेरा युवा पुरस्कार मोहन नवले, अंकलखोप सावित्रीबाई राघोबा रोटे आदर्श युवती पुरस्कार सुप्रिया पाटील, पेठवडगाव यांना जाहीर झाला आहे. स्व.वालुबाई शिवलाल शहा प्राणिमित्र पुरस्कार यशवंत सुर्वे, बैरागवाडी (सोलापूर) विशेष सेवा पुरस्कार
कुलभूषण बिरनाळे, अ.लाट यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
15 मे रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी यावेळी रावसाहेब पाटील यांनी आवाहन केले.
याप्रसंगी सभेचे चेअरमन रावसाहेब जी. पाटील, व्हाईस चेअरमन दत्ता डोरले, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा. पा. पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील, के.जे.ए.चे संचालक युवानेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *