
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवार दि. २ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक येथे शिवस्मारक भूमिपूजन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. शिवस्मारकाचे भूमिपूजन राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते केले जाणार आहे. शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी भूषविणार आहेत. सोहळ्याला सर्व नगरसेवक-नगरसेविकां उपस्थित राहणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघाचे अमर नलवडे यांनी सांगितले.
शिवाजी चौकाची स्वच्छता मोहिम
सोमवार दि. २ मे २०२२ रोजी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपूजन सोहळा होत असल्याने संकेश्वर पालिकेतर्फे शिवाजी चौकात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आलेली दिसत आहे. पालिकेचे सफाई कामगार शिवाजी चौकातील केरकचरा काढून शिवाजी चौक चकाचक केलेले दृश्य पहावयास मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta