Monday , April 20 2026
Breaking News

पंडित ओगलेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच भाजपच्यावतीने तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच बुधवारी दि. २७ रोजी मध्यरात्री ओगले यांच्यावर हल्ला करण्यासाठी तिघे युवक शास्त्रासह त्यांच्या घरात शिरले होते.
याप्रकरणी वज्रेश शिंदे खानापूर, रफिक (टिपू सुलतान नगर हुंचेनट्टी), अक्रम डंबलकर (न्यू निंगापूर गल्ली खानापूर) व सॅविओ परेरा (खानापूर) या चौघावर कडक कारवाई करावी. तसेच त्यांच्यामुळे भविष्यात पंडित ओगलेंच्या जीवाला धोका आहे. तेव्हा त्यांना पोलिस सरंक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवून देऊन, दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांना सुचना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजपचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *