Saturday , October 19 2024
Breaking News

श्रीमंतांचे बीपीएल कार्ड रद्द : मंत्री उमेश कत्ती

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटकातील करदाते (इन्कमटॅक्स भरणारे), सरकारी सेवेत नोकरी करणारे आणि जमीन-जुमला असणाऱ्या १३ लाख लोकांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मात्र बीपीएल कार्डाचा लाभ मिळणार आहे. बरेच रेशन कार्डधारक दारिद्र रेषेखाली नाहीत. तरी ते गरीबांचे अन्न हिसकावून खात आहेत. याकरिता आपण संबंधित अधिकारींना बीपीएल कार्डधारकांची संपूर्ण माहिती घेऊन सर्व्हे करणेचा आदेश धाडला आहे. तलाठी कार्यालयातून खोटी कागदपत्रे मिळवून बीपीएल कार्ड मिळविलेल्या सधन लोकांनी आपणहून कार्ड रद्द करुन घ्यावे. अन्यथा त्यांचेवर कारवाई होऊ शकते. राज्यातील करदाते, सरकारी नोकरीत असणारे आणि जमीन-जुमला असणाऱ्या लोकांचे बीपीएल कार्ड रद्द करुन त्यांना एपीएल कार्ड वितरण केले जात आहे.
लवकरच ज्वारी अन् बाजरी..
राज्यातील बीपीएल कार्डधारकांना लवकरच ज्वारी अन् बाजरी मिळवून देण्याचे कार्य केले जाणार आहे. याविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी लवकरच चर्चा करुन राज्यातील स्वस्त धान्य दुकानांत ज्वारी बाजरी मिळण्याची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, गंगाराम भूसगोळ, प्रमोद होसमनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *