Sunday , July 26 2026
Breaking News

समाजहितासाठी सकल मराठा कटिबद्ध

Spread the love

बेळगाव : सकल मराठा समाजातर्फे 15 मे 2022 रोजी समाजहितासाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी व मराठा समाजाचे गुरु परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांचा तेरावे धर्मगुरू म्हणून अधिकार ग्रहण समारंभ पार पडला याचे औचित्य साधत सत्कार समारंभ, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजे शहाजी राजे यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी बेंगलोर येथे मराठा धर्मगादी निर्माण केली या धर्मगादीची सर्व समाजाला माहिती मिळावी आणि समाजाला उचित दिशा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतरही मराठा समाजासाठी अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. भव्य प्रमाणात या कार्यक्रमासाठी समाज एकवटणार आहे. त्यासाठी नियोजनाच्या बैठकाही चालू झाल्या आहेत. ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून समाजासाठी कार्यरत व्हायचे आहे त्यांनी त्वरित सकल मराठा समाजाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
बेळगाव व सीमावर्ती भाग हा गेली अनेक वर्ष भाषिक संघर्ष करत आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा अशी मागणी ‘सकल मराठा समाज’ मानवीय भावनेतून करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *