
संकेश्वर (प्रतिनिधी) : नेत्रदान, देहदान अवयवदान करुन जीवन सार्थक करायला हवे असल्याचे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. येथील श्री साईभवनमध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला चालना देऊन स्वामीजींनी नेत्रदानाचे महत्व समजावून सांगितले. अध्यक्षस्थान संकेश्वर ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. संकेश्वर ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्र, सिध्दगिरी हाॅस्पिटल आणि संशोधन केंद्र कणेरीमठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री शंकराचार्य स्वामीजी पुढे म्हणाले देह नश्वर आहे. त्यामुळे जीवनात अवयवदान करायला हवे. मिळालेले आयुष्य समाधानांनी जगताना नेत्रदान देहदान अवयवदान करायला हवे असल्याचे सांगितले. शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला चौहान यांनी १२० नेत्ररुग्णांची तपासणी करुन सल्ला दिला.मोफत नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात श्रींच्या आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन करण्यात आली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण पी. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस.आर. चिनमुरी यांनी केले. आभार संजय मेंडूले यांनी मानले. यावेळी आणप्पा डोनवाडे, रामू मुरचट्टी, प्रकाश हिरेमठ, चंद्रशेखर सनदी, बसवाणी सनदी, सुनिल शिंदे, चनप्पा चौगुले योग साधक, नेत्ररुग्ण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta