
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला निडसोसी श्रींच्या कृपेने निश्चितच अच्छे दिन आल्याचे किसान सोसायटीचे अध्यक्ष दस्तगीर तेरणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीस वर्षांत आंमच्या होलसेल भाजी मार्केटने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक भाजी मार्केटमध्ये नावलौकिक मिळविला आहे. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी आपणाला होलसेल भाजी मार्केट सुरू करण्यासाठी श्री मठाची जागा उपलब्ध करून दिली. आपण 1992 मध्ये श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटचा शुभारंभ केला. त्यावेळी केवळ आपले एकच दुकान गाळे होते. बघता-बघता येथील होलसेल भाजी व्यापार वाढत गेला. आज माजी मार्केट मध्ये 36 होलसेल दुकान आहेत. आमचे श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केट फ्रेश भाजीसाठी प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक भाजी व्यापारी आंमच्या मार्केटशी जोडले गेले आहेत. गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागांव, उत्तूर, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, फोंडा, गोवा, येथे आमच्या ताज्या फ्रेश भाजीला मोठी मागणी राहिली आहे. त्यामुळे तेथील भाजी व्यापारी आंमच्या मार्केटमधून होलसेल भाजी खरेदी करतात.

होलसेल भाजी मार्केटचा 30 वा वर्धापनदिन
आमच्या श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटचा 30 वा वर्धापनदिन समारंभ मंगळवार दि. 17 मे 2022 दुपारी 12 वाजता होत आहे. समारंभाला निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजी, हुक्केरी गुरुशांतेश्वर हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री शिवपंचाक्षरी स्वामीजी (अडळहट्टी), पाहुणे म्हणून राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी मंत्री ए. बी. पाटील, माजी खासदार रमेश कत्ती, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, मुख्याधिकारी जगदीश ईटी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी दिलीप होसमनी उपस्थित राहणार आहेत. समारंभात श्रींचा गौरव आणि प्रगतशील शेतकरी, उत्तम भाजी व्यापारी यांचा सत्कार केला जाणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेरणींचा भाजी व्यापार
आमचे वडील बाबू शहाबुद्दीन तेरणी यांनी 1945 च्या दरम्यान गांधी चौक येथून किरकोळ भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो अद्याप सुरू आहे. आपण किरकोळ भाजी व्यापारातून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. 1992 मध्ये निडसोसी श्रींच्या आशीर्वादाने श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटचा शुभारंभ करुन हळूवारपणे मार्केटची सुधारणा घडवून आणण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केट जुन्या पी. बी. रोडवर वसले असून स्वच्छतेत नंबर वन ठरले आहे. बेळगांव नंतर संकेश्वर होलसेल भाजी मार्केटचा क्रमांक लागतो, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta