Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उद्यानात शंभूराजे जयंती साजरी करण्यात आली. संकेश्वर पालिका संभाजीराजे उद्यानातील छत्रपती संभाजीराजे प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनूरी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी करुन मानाचा मुजरा केला. यावेळी उपस्थित शंभूप्रेमीनी धगधगता लाव्हा. स्वराज्याचा छावा.. संभाजीराजे यांना मानाचा मुजरा केला. यावेळी माजी नगरसेवक दीपक भिसे, समीर पाटील, सुभाष कासारकर, श्याम यादव, नेताजी आगम, नगरसेवक सचिन भोपळे, ओंकार डावरे, ओंकार भिसे, गजू मोकाशी, श्रीजित शिंत्रे, समर्थ टिक्के, संतोष लोखंडे, राकेश डोंगरे, अक्षय पोवार, शंभूराजेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *