
संकेश्वर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक 13 हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे कार्य निश्चितपणे केले जाणार असल्याचे काँग्रेसचे नेते बसनगौडा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत संजय नष्टी यांना सातत्याने तीन वेळा निवडून आणण्याचे कार्य काँग्रेसने केले आहे. संजय नष्टी यांच्या अकालिक निधनाने येथील पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी प्रभाग 13 मधील नागरिकांची आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांची सभा घेऊन प्रभाग 13 च्या पोटनिवडणूकसाठी येथील नागरिक, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अॅड. प्रविण नेसरी यांची सर्वानुमते निवड करुन आखाड्यात उतरविले आहे. सदर प्रभागात संजय नष्टी यांना तीन वेळा निवडून देण्याचे कार्य आम्ही करुन दाखविले होते. त्याचप्रमाणे अॅड. प्रविण नेसरी यांना देखील आम्ही सर्व काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते रात्रंदिवस तनमनधनाने राबून विजयी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार अॅड. प्रविण नेसरी, शिवकुमार नष्टी, नगरसेवक जितेंद्र मरडी, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta