संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार चाललेला दिसत आहे. येथील गाडगी गल्लीतील प्रचार प्रसंगी काॅंग्रेस-भाजप आमने-सामने आल्यामुळे थोडासा गोंधळ उडालेला दिसला. काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांच्या प्रचार सभेत ॲड. विक्रम कर्निंग यांनी राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टिका घालविल्याचे पाहून भाजपा कार्यकर्त्यांनी भारत माता की जय नंदू मुडशी यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. काॅंग्रेसच्या प्रचार सभेतून भाजपा कार्यकर्ते मार्गाक्रम करतांना एकमेकांना नमस्कार चमत्कार करतानाचे चित्र पहावयास मिळाले. भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या पदस्पर्शाने नमस्कार केल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत होऊन पहातच राहिले.
गंगाधर पट्टणशेट्टी दोन्हीकडचे पाहुणे..
भाजपाच्या प्रचारात सहभागी झालेले गंगाधर पट्टणशेट्टी यांनी ए. बी. पाटील यांच्या आग्रहाखातर काॅंग्रेसच्या सभेत आसन ग्रहण करून बसलेले दिसले. त्यामुळे कार्यकर्त्यांतून गंगाधर पट्टणशेट्टी दोन्हीकडचे पाहुणे ठरल्याची जोरदार चर्चा होताना दिसली.
Belgaum Varta Belgaum Varta