
नवरदेवसह ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आज संततधार पावसात ७७% मतदान झाले. अक्कमहादेवी कन्या शाळा मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात शांततेने मतदान पार पडले. येथे १४७८ मतदानापैकी. ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नवरदेवासह अपंग, वृध्दांचा देखील समावेश होता. गुरुवार दि. १९ रोजी रात्री सुरु झालेला मान्सूनपूर्व पाऊस शुक्रवार दि. २० रोजी मतदान संपेपर्यंत बरसत राहिला. त्यामुळे मतदारांना भरपावसात ॲटोरिक्षा, कार वाहनातून येऊन मतदानाचा हक्क बजवावा लागला. बहुसंख्य मतदारांना छत्र्या घेऊन मतदान केंद्र गाठावे लागले. सकाळी ठिक सात वाजता मतदानाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळाली. निवडणूक रिंगणातील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी हे अन्य प्रभागातील असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदान केंद्राबाहेर काॅंग्रेस-भाजपचे नेतेमंडळी कार्यकर्ते मतदारांकडून मतयाचना करताना दिसले. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी माजी खासदार रमेश कत्ती, युवानेते पवन कत्ती पृथ्वी कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, रोहण नेसरी, प्रमोद होसमनी, सचिन भोपळे, पुट्टू नष्टी, संदिप गंजी, संदिप दवडतेसह भजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते अभिमानी विशेष परिश्रम घेतांना दिसले. काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बसनगौडा पाटील, प्रकाश नेसरी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अप्पासाहेब पचंडी, सुभाष कासारकर, अविनाश नलवडे काॅंग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते अभिमानी यांनी कंबर कसलेली दिसली. सकाळी ७ ते ११.३० वाजता ५०% मतदान झालेले दिसले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर काॅंग्रेस-भाजप उमेदवारांकडून मतदारांचे स्वागत मतकेंद्रावर काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी, भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी मतदारांचे आदरपूर्वक स्वागत करताना दिसले. दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर रिलॅक्स दिसल्यामुळे गुलाल कोणाचा? यांचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे.
नवरदेवाचे मतदान

प्रभाग क्रमांक १३ मधील मतदार श्रीधर लब्बी यांचा आज विवाह होता. नवरदेव श्रीधर हे लग्नाच्या बोहल्यावरुन थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
रविवार दि. २२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यादिवशी प्रभाग १३ चा नगरसेवक कोण हे समजणार आहे. तोपर्यंत अंदाज अपना-अपना वर्तविला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta