संकेश्वर (महंमद मोमीन) : वधुवर सुचक केंद्राकडून मुला-मुलींची फसवणूक चालल्यामुळे विवाह इच्छूकांची मोठी भ्रमनिरास होऊ लागली आहे. त्यामुळे विवाह इच्छूक मुला-मुलींंचा कल लव्ह मॅरेजकडे दिसू लागला आहे. याविषयी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना विवाह इच्छूक विनायक भोसले म्हणाले, वधुवर सुचक केंद्रे बकवास ठरली आहेत. येथे विवाह जुळविण्याचे कार्य कांही केले जात नाही. उलट विवाह इच्छूक मुला-मुलींची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. वधुवर केंद्रात नाव नोंदणीसाठी वार्षिक हजार- दोन हजार रुपये फि (शुल्क) भरुन वर्षानुवर्षे प्रतिक्षा करायची. स्थळ कांहीं दाखविले जात नाही. विचारणा केली असता राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात नाव नोंदणीसाठी सांगितले जाते. तेथे परत पैसे मोजावे लागतात. मेळाव्यात इच्छूक मुला-मुलींंचे विवाह जुळविण्याचे कार्य काही होत नाही. उलट तेथे देखील इच्छूक मुला-मुलींची लुबाडणूक केली जाते. वधु-वर मेळावे म्हणजे पैसे लाटण्याचा धंदा बनला आहे. मुली दाखवायला हजार ते पाच हजार रुपये मागितले जातात. मुलीची माहिती बायोडाटा न देता थेट मुलीच्या घरी बोलावून घेऊन जाऊन तेथे वधुवर पक्षाकडून पैसे काढण्याचे काम एजंट लोक पध्दतशीरपणे करताहेत. त्यामुळे वधुवर सुचक केंद्रा्ंवरुन लोकांचा विश्वास उडाला आहे. वधुवर सूचक केंद्राच्या नांदी लागून वेळ पैसा घालविण्यापेक्षा लव्ह मॅरेज केलेलं बरे असा मतप्रवाह विवाह इच्छूक मुला-मुलींमध्ये निर्माण होऊ लागला आहे. विवाह इच्छूक मुला-मुलींची फसवणूक करणाऱ्या वधू-वर सूचक केंद्रांवर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे विनायक भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले आमच्या वधू-वर केंद्रात विवाह जुळविले जातात, हजारो स्थळे उपलब्ध आहेत. अशा जाहिरातीला कोणीही बळी पडू नका. विवाह जुळविण्यासाठी आता परिचयातील लोकांची, शेजारच्या लोकांची, नातेवाईकांची मदत हाच नामी उपाय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …