संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमात विनायक मळनाईक, संतोष सत्यनाईक, शिवराज हिरेमनी, बसवराज सत्यनाईक, गिरीश सत्यनाईक, संजय जयकर, विजय रायण्णावर, भिमसेन सत्यनाईक, संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनचे उमेश गोटूरे, कुमार संसुध्दी, लाडजी मुल्तानी, विजय पिरगानी, प्रभाकर पाटील, दयानंद आलुरी, यासिन जकाते, रोहित दोडलिंग, शाळा शिक्षकांनी आपला सहभाग दर्शविला.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …