Sunday , July 21 2024
Breaking News

पारगडच्या पाणी प्रश्नासाठी आमदार राजेश पाटील जीव धोक्यात घालून दरीमध्ये पायी केले “वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन”

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पारगड (ता. चंदगड) या ऐतिहासिक किल्याबरोबर परिसरातील गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त आमदार राजेश पाटील यांना समजले. तात्काळ आमदार पाटील यांनी पारगडवर जाऊन पाणी प्रश्नासंदर्भात स्वतःचा जिव धोक्यात घालून थेट दरीमध्ये उतरून पायी चालत वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन केले.
सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व एका अभ्यासू व्यक्तीच्या हाती आहे. शांत, संयमी व्यक्तिमत्व असलेल्या आमदार राजेश पाटील यांना विविध प्रश्नांची चांगली जाणिव आहे. पारगडवर पाणीटंचाई लक्षात येताच तात्काळ पाणी पुरवठा उपअभियंत्या श्रीमती सुभद्रा कांबळे यांना याची माहिती दिली. येथील दरीत असणारे नैसर्गिक जलस्रोत शोधण्याचे ठरवले. त्यानुसार स्वतः आमदार राजेश पाटील सोबत सरपंच संतोष पवार, उपअभियंता शाखा अभियंता पृथ्वीराज पाटील, ग्रामसेवक संतोष तांबळे, माजी पो.पाटील नारायण गडकरी, कान्होबा माळवे, पत्रकार एस. के. पाटील, विश्वास पाटील यांच्यासह थेट दरीत उतरण्यास सुरवात केली. गर्द झाडी, समोर दरी, झाडा झुडपानी आच्छादलेल्या जंगलातून वाट शोधताना सर्वांची दमछाक होत होती. आजूबाजूला जंगली प्राण्यांचा तर प्रचंड धोका, कानावर
केवळ पक्षांचा आवाज पडत होता. गर्द झाडीमुळे सुर्यदर्शन तर दुर्मिळ झाले होते. अशा कठीण परिस्थितीत अनेक जण पायाखालील दगड घसरून तर कधी पायात वेली अडकल्याने धडपडत होते. एकमेकांना हात देत आमदार पाटील दरीतील ओढ्यातील झऱ्यापर्यंत पोहचले. तेथील पाणी स्त्रोतासंदर्भात
सविस्तर पहाणी करुन पुन्हा दरी चढून पारगड गाठला. पण या ठिकाणी आमदार पाटील यांच्या पायाला येथील जंगलातील कनिट लागल्याने पायातून रक्तस्राव होऊ लागला. त्याबरोबरच पत्रकार एस. के. पाटील व एन. एस. गावडे
यांनाही कानिट चिकटले. तेथून पन्हा पाच कि.मी. अंतरावरील शेगलाच्या नदिमध्ये असणाऱ्या जलसाठ्याकडे आमदार पाटील पहाणीसाठी गेले. या ठिकाणी असणारे प्रचंड महाकाय दगडांचा डोंगर चढताना व उतरताना प्रचंड धोका निर्माण झाला होता. उपस्थितांपैकी अनेकांनी तिकडे जाणे टाळून आमदार राजेश पाटील यांनायेथील प्रचंड धोक्याची जाणिव करून दिली. पण आमदार पाटील हा धोका पत्करून त्या पाणी साठ्यापर्यंत पोहचलेच. या दोन्ही जलस्त्रोत्रांची पहाणी करून अधिकारी व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. पाणीप्रश्नासंदर्भात धडपडणारे आमदार राजेश पाटील यांना पाहून उपस्थितापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

About Belgaum Varta

Check Also

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अनिल धुपदाळे यांची निवड

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व डीबीसी लाईव्ह पोर्टल चॅनेलचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *