Tuesday , March 3 2026
Breaking News

काॅंग्रेस रस्त्यासाठी आंदोलन छेडणार : संतोष मुडशी

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ हाॅस्पिटल दरम्यान जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम कसेबसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. सदर रस्त्याचे काम व्यवस्थित करावे. अन्यथा संकेश्वर काॅंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी दिलीप होसमनी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम ओबडधोबड करण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक न करता कांहीं जागा तशीच सोडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दोहो बाजुला फूटपाथ वजा गटार निर्माणचे काम देखील व्यवस्थित करण्यात आलेले नाही. राणी चन्नम्मा सर्कल जवळ बारीक खडी इतरस्त विखुरलेली असल्याने हे ठिकाण अपघातला निमंत्रण देणारे ठरले आहे. तसेच रस्त्याच्या दोहो बाजुला खडी, माती पडलेली दिसताहे. हाॅटेल राजधानी पुढचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सदर रस्ता कामाला कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करुन दिला आहे. रस्ता निर्माण कामाच्या ठेकेदारांनी रस्त्याचे काम कांहीं चांगले केलेले नाही. त्यामुळे रस्ता सोयी पेक्षा जादा गैरसोयीचा झालेला दिसत आहे. मंत्रीमहोदयांनी स्वतः रस्त्यांची पहाणी करुन रस्ता निर्माण ठेकेदाराला रस्ता व्यवस्थित करुन देण्याचा आदेश धाडायला हवा आहे. सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचे काम रस्ता निर्माण ठेकेदारांनी हाती न घेतल्यास संकेश्वर घटक काॅंग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *