
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि पुष्पवृष्टी करीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. अभिषेक कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, जयप्रकाश सावंत, समीर पाटील, अप्पा मोरे, डॉ. मंदार हावळ, शाम यादव, सुभाष कासारकर, पुष्पराज माने यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
यावेळी अमोल अटक, बसवराज नागराळे, अप्पा शिंत्रे, सुनिल ओतारी, पांडुदादा दवडते, कन्हैया भोसले, अविनाश नलवडे, निजलिंगप्पा दड्डी, शिवराम शेलार, नेताजी आगम, पिंटू कारेकर, संदिप बांबरे, अनंत चाळके, गणेश कोळेकर, ओंकार डावरे, बाबासाहेब इंगळे, अक्षय खाडे, यश शिंत्रे, योगेश जाधव शिवप्रेमी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शांत वाडा येथील भवानी मंदिरात शिवराज्याभिषेकदिन जयप्रकाश सावंत, सौ. सविता सावंत दांपत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन साजरा करण्यात आला. पुरोहित वामन पुराणिक यांनी वेदमंत्रांंत पूजन केले. यावेळी शिवभक्त महिला, शिवप्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta