Monday , December 8 2025
Breaking News

एसडीव्हीएस शिक्षण संस्थेच्या वतीने जागतिक योगदिन साजरा

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ, वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्र आणि ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एस डी हायस्कूलच्या मैदानावर योग-प्रणायमाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, संचालक दयानंद केस्ती, विश्वनाथ तोडकर, कार्यदर्शी जी. एस. कोटगी प्रशासकिय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी, डॉ. रमेश दोडभंगी, योग शिक्षक बसवराज नागराळे, योगशिक्षक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी वृक्षरोपाला जलार्पण करुन जागतिक योगदिन कार्यक्रमाला चालना दिली. योगशिक्षक बसवराज नांगराळे, योगशिक्षक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी योग-प्राणायमचे महत्व समजावून सांगत साधकांना योगासन प्राणायाम शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा सराव करुन घेतला. जागतिक योगदिन कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सहभागी होऊन योगासन प्राणायामचे धडे गिरवले. एस डी. हायस्कूल मैदान साधकांनी फुलून गेलेले पहावयास मिळाले. येथील जागतिक योगदिन कार्यक्रमात एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिंनी शिक्षक-शिक्षिका ,ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्र आणि वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ओम श्री शंकराचार्य-वंदेमातरम एकत्र
संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेने संकेश्वरातील ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्र आणि वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राला एकत्र आणण्याचे कार्य करुन दाखविले. प्रथमच गुरु-शिष्य एकाच व्यासपीठावर योगसाधना शिकवितांना दिसले. माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी दोन्ही योग प्रशिक्षण केंद्रामध्ये समेट घडवून आणण्याचे कार्य करुन दाखविले. योगदिन कार्यक्रमात डॉ. रमेश दोडभंगी अजय सारापूरे, सुधाकर शेट्टी, अच्युत पेंडसे, विष्णू जाधव, राजू सुतार, किर्तीकुमार संघवी, शंकर चिनमुरी, प्रा.संतोष तेरणीमठ, प्रशांत मन्नीकेरी, योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *