Monday , December 8 2025
Breaking News

संकेश्वर पोलिसांकडून तीन मोटारसायकल चोर गजाआड

Spread the love

चोरांकडून २ लाख किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी हे संकेश्वरातील जुना पी. बी. रोड येथील युपी धाब्याजवळ वाहन तपासणीचे कार्य करताना तीन मोटारसायकल चोर सापडले आहेत. बेळगांव निपाणी येथील सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबूली चोरांनी केली आहे.
याविषयीची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी हे जुना पी. बी. रोड युपी धाब्याजवळ वाहन तपासणीचे कार्य करीत असतांना बेळगांवहून संकेश्वरकडे एका मोटारसायकलवरुन (टिब्बल सिट) तिघे जण येत असल्याचे पाहून त्यांना पोलिसांनी अडविले. पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी मोटारसायकलची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. गाडीची कागदपत्रे नसल्याने तिघे गडबडून गेलेले पाहून त्यांची कसून चौकशी केली असता ते मोटारसायकल चोर असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक चोर संजू मलप्पा मेकली (वय २२), भरम यलाप्पा नाईक (वय २२) दोघे राहणार बेनकेनहोळी तालुका हुक्केरी, गंगाधर करेप्पा मुत्यानट्टी (वय २१) राहणार कारावी यांना अटक करुन चोरट्यांकडून नंबर प्लेट नसलेली एक स्पेलेंडर मोटारसायकल, तसेच स्पेलेंडर प्रो क्रमांक एम.एच ०९/ डीई ७३०६, एक हिरो होंडा, एक हिरो स्पेलेंडर, स्पेलेंडर प्लस क्रमांक के.ए.२३/ ईएस ६३२८ बाईक, चोरीसाठी वापरण्यात आलेली हिरो स्पेलेंडर प्रो क्रमांक केए २२/ईआर ८३२२ जप्त करण्यात आली आहे. चोरांकडून एकूण सहा मोटारसायकली अंदाज किंमत दोन लाख रुपये, हस्तगत करण्यात आले आहे. चोरांना गजाआड करण्याकामी पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलीस कर्मचारी बी.बी. हुलकुंद, बी. के. नांगनुरी, महेश करगुप्पी, बी. एस. मेलगट्टी, वाय. एच. नदाफ, एस. एस. कुदरे, एम. आय. चिपलकट्टी, बी. आय. पाटील, एम. एम. जंबगी, बी. जी. करीगार यांनी विशेष परिश्रम घेतले. संकेश्वर पोलिसांत मोटारसायकल चोरी प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *