संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरल्याचे निजलिंगप्पा दड्डी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम करतांना दुभाजक ऐवजी रस्त्याच्या मधोमध कसेबसे पेव्हरचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने घसरुन येथे अपघात घडत आहेत. सदर रस्ता कामांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी कोट्यावधी रुपये निधी मंजुर करुन दिला आहे. पण दुर्दैवाने रस्ता निर्माण कामाकडे कोणाचेच लक्ष दिसेनासे झाले आहे. त्यामुळे रस्ता निर्माणचे काम कसेबसे केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. परवा माजी खासदार रमेश कत्ती यांनी रस्ता कामाची पहाणी करुन रस्ता निर्माण ठेकेदाराला, अभियंता याना रस्त्याचे काम उत्कृष्ट करण्याविषयी सांगितले आहे. पण संबंधित ठेकेदार, अभियंता हे कोणी कांही सांगितले तरी आपल्या कामातील मनमानीपणा उघडपणे दाखवून देत आहेत. त्यामुळे संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर चौपदरीकरणाचे काम व्यवस्थित होताना कांही दिसेनासे झाले आहे. इकडे आता तरी नेतेमंडळींनी लक्ष देऊन रस्ता निर्माणचे काम व्यवस्थितपणे करुन घेण्याची आवश्यकता असल्याचे दड्डी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta