Tuesday , September 17 2024
Breaking News

निडसोसी श्रींच्या आरोग्याची महास्वामीजींकडून विचारपूस

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी काल रस्ता अपघातात सुखरुप बचावले. श्रींच्या आरोग्याचे विचारपूस करण्यासाठी आज श्रीशैल जगद्गुरू, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, मनकवाडचे श्री सिध्दरामेश्वर महास्वामीजी, इलकलचे श्री महांत स्वामीजी, श्री शेगुणशी स्वामीजी, तम्मणहाळी हावेरीचे स्वामीजी, हुक्केरी हिरेमठचे श्री गुरुसिध्देश्व महास्वामी जणींनी निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला भेट देऊन निडसोसी श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. दरम्यान राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी देखील श्रींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मंत्रीमहोदयांसमवेत पवन पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री शंकराचार्य स्वामीजीं म्हणाले, अपघाताची भिष्णता पाहुन निडसोसी श्रींच्या प्रकृतीची मोठी काळजी लागून राहिली होती. आज श्रींच्या प्रत्यक्ष भेटीने काळजी मिटल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, गिरीश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, अर्जुन कानवडे उपस्थित होते. निपाणी हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे चंद्रकांत कोठीवाले, प्रकाश पाटील आणि सर्व संचालकांनी श्रींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
श्री दुरदुंडीश्वराची कृपा..
निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, हुबळीहून निडसोसी मठाकडे परततांना इनोव्हा स्किड होऊन दोन-तीन पलटी खाली. क्षणार्धात वाटले आता कांहीच खऱ्यातले नाही. पण श्री दुरदुंडीश्वराच्या कृपेने माझ्यासह चालक आणि तिचा शिष्यांना कांहीच झालं नाही. अपघातातून आंम्ही सर्वजण सुखरुप बचावलो. आम्हाला इनोव्हामधून भक्तांनी सुखरुप बाहेर काढले. तदनंतर बेळगांव केएल ई इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले. इनोव्हामध्ये आंम्ही बेल्ट बांधले होते. पण अपघातात प्रसंगी एअर बॅग कांहीं उघडले नाहीत, असे श्रींनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *