संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली लाभली आहे. योगगुरु बसवराज नागराळे यांच्यामुळे आपण योगसाधक बनल्याचे सांगितले. शिक्षक एस. आर. चिनमुरी यांनी प्रास्ताविक भाषणात गुरुपौर्णिमेविषयीची माहिती दिली. व्यासपीठावर योगसाधक राम मुरचट्टी, आणप्पा डोनवाडे, सौ. अनिता बी. नागराळे विराजमान झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती लिना कोळी यांनी केले. आभार श्रीमती कुंभार यांनी मानले. यावेळी योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta