संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डाॅ.स्मृती हावळ, इंद्राणी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने लेडिज फोरमचे शानदार उद्धघाटन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्रेक्षा पुजारी यांनी केले. डाॅ स्मृती हावळ पुढे म्हणाल्या, महिलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शांती समाधानाचे तंत्र अवलंबावे. मानसिक दबावामुळे अनेक रोग नकळतपणे निर्माण होतात. त्याचा सामना करण्यात महिलांचे आयुष्य निघून जाते. याकरिता महिलांनी शांती समाधानाने जगायला शिकायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इंद्राणी पाटील, समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य आर. एम. मिनची यांनी समाजात महिलांचे स्थान श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले. अंकिता निलाज हिने सूत्रसंचालन केले. शेवटी आभार प्रदर्शन आर.अंकिता यांनी केले. समारंभाला प्राध्यापक, विद्यार्थींनी उपस्थित होते.