संकेश्वर (प्रतिनिधी) : परवा झालेली गौप्य मिटींग आगामी तालुका- जिल्हा पंचायत निवडणूक तयारीची होती. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नव्हता, असे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले येथील तलाव सुधारणा आणि संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ करुन पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री उमेश कत्ती पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपा हायकमांड घेईल. त्यात आंमचा हस्तक्षेप चालणार नाही. त्यामुळे गौप्य मिटींग घेऊन तशी कोणतीच चर्चा केली गेलेली नाही. मिटींगला बेळगांव जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना खासदारांना बोलाविण्यात आले होते. जारकीहोळी बंधू गैरहजर होते. याचा अर्थ त्यांना वगळून मिटींग घेण्यात आली असा होऊ शकत नाही. मिटींगला येणे न येणे त्यांना सोडलेला विषय आहे. विधानपरिषद निवडणुकीत पराजय होण्यामागची कारणमिमांसा शोधण्यात आली आहे. त्याविषयावर जाहीरपणे सांगणे इष्ट होणार नाही. सभेला खासदार अण्णासाहेब जोल्लले, इरण्णा कडाडी, लक्ष्मण सवदी, महांतेश कवठगीमठ आणि आमदार उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.
संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ संकेश्वर श्री शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्य करण्यात आला. यावेळी वीरशैव समाज अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta