
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिरात संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीला महाभिषेक, संत श्री नामदेव महाराज प्रतिमेला महाभिषेक करुन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोहळ्यात सोलापूरचे किर्तनकार दिलीप भडंगे महाराजांनी संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधीपर किर्तन सादर केले. श्री नामदेव महिला मंडळाने नृत्याविष्कार सादर केला. सोहळ्यात युवानेते पवन कत्ती, बसनगौडा पाटील, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, नंदू मुडशी, डॉ. मंदार हावळ, रोहण नेसरी, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष मुरलीधर उंडाळे, कृष्णकांत मुळे, गणेश कोळेकर, श्रीनिवास कोळेकर, प्रसाद भागवत, प्रमोद कोळेकर, शंकर बोंगाळे, किरण खटावकर चरण खटावकर, अभिजित रेळेकर, नारायण उंडाळे, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री नामदेव तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta