संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुभाष रस्ता येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ भुट्टो दुंडप्पा नेसरी (वय ५५) यांचे आज सकाळी ११.३० वाजता तीव्र हृदयघाताने निधन झाले. सकाळपासून त्यांना थोडसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉ. टी. एस. नेसरी यांच्याकडे आरोग्य तपासणी करुन घेतली होती. डाॅक्टरांनी त्यांना एसीजी तपासणीचा सल्ला दिला होता. अरुण आपल्या ॲक्टीवा मोटारसायकलने संकेश्वरतील हृदयरोगतज्ञ डॉ. विकास पाटील यांच्याकडे आरोग्य तपासणीसाठी जात असताना वाटेत सोयल चिकोडी पेट्रोल पंप जवळ तीव्र हृदयघाताने कोलमडले. त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ते कन्नडपर संघटनेचे नेते किरण नेसरी यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, वडील बंधू, बहिणी असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta