संकेश्वर : गोटूर बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेस कर्नाटकच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीपात्रात संकेश्वर परिसरात सुमारे आठ फुटाहून अधिक लांबीची मगर फिरत
आहे.
दोन दिवसांपूर्वी नांगनूर येथील शेतकरी रामचंद्र कोकितकर यांनी नदीकाठी मगर फिरताना प्रत्यक्ष पहिली आहे. सदर मगर केव्हाही नदीपात्राबाहेर येऊ शकते त्यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या वर्षभरापासून हिरण्यकेशी नदीपात्रात कर्नाटक हद्दीत वावरणाऱ्या मगरीचा संबंधित विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या भागातील जनतेने केली तर नदीपात्रात पाणी जास्त असल्याची सबब सांगून मगरीचा बंदोबस्त करण्याचे टाळले जात आहे. हिरण्यकेशी नदीपात्रात बारमाही पाणी वाहते म्हणून मगरीचा बंदोबस्त करणार नाही का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्ग करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta