
संकेश्वर (महंमद मोमीन): संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. गेली दोन वर्षे झाली कोरोनाच्या जाचक नियमांमुळे बाप्पांचा उत्सव भक्तगणांना दिमाखात साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्याची आतापासूनच तयारी चाललेली दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, देखावा आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत. संकेश्वर बाजारात श्री गणेश सजावटीची दुकाने आकर्षक साहित्याने लोकांना आकर्षित करतांना दिसत आहेत.
वीरश्रीची आकर्षक प्रभावळ..
सुभाष रस्ता येथील प्रसाद बेविनकट्टी यांच्या वीरश्री जनरल स्टोअर्समधील गणपतीचे आरस साहित्य लोकांना आकर्षक करतांना दिसत आहे. येथे श्री गणरायांच्या आरस करीता लागणारी गणपतीची वेल तोरण, माळ, कापडी फुलांची प्रभावळ उपलब्ध आहे. प्रसाद बेविनकट्टी परिवार आकर्षक गणपती प्रभावळ कामात व्यस्त दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रसाद बेविनकट्टी म्हणाले, आपल्या वीरश्री जनरल स्टोअर्समध्ये गणपतीचे आरस साहित्य उपलब्ध आहे. गणपतीची फुलांची माळ १० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत आहे. कापडी फुलांची आकर्षक गणपती प्रभावळ ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आमच्या परिवाराने कापडी फुलांचे विविध नमुन्यांचे गणपती प्रभावळ तयार केले आहेत. गणपती प्रभावळ विथ ॲंगल तयार केले आहे. प्रभावळ आकर्षक असल्यामुळे लोक आतापासूनच खरेदी करताहेत. त्यामुळे प्रभावळ कमी पडण्याची शक्यता आहे. याकरिता घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रभावळसाठी ऑर्डर करायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले.
नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन होणार…
गेली दोन वर्षे झाली संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. यंदा भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. निलगार गणपती दर्शनासाठी भक्तगणांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस यंत्रणा सज्ज ठेवणेचा विचार आखला जात आहे. हेद्दुरशेट्टी परिवाराने निलगार गणपती दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वेळ निश्चित करणेचा विचार चालविला आहे. भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक गांधी चौक ते हेद्दुरशेट्टी यांच्या घरापर्यंतचा मार्ग मोकळा ठेवला जाणार आहे. त्यामुळे भक्तगणांना रांगेत उभे राहून निलगार गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. प्रसाद साहित्याची दुकाने, खेळणीची दुकाने, पेढे विक्रेत्यांना आपले स्टाॅल महालक्ष्मी मंदिर पटांगणात थाटता येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta