
संकेश्वर (महंमद मोमीन) : युवकांनी भारताला श्रेष्ठ बनविणेचे कार्य करायला हवे असल्याचे वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांनी सांगितले. ते संकेश्वर नवभारत बळगतर्फे नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित युवा मेळाव्याला उद्देशून बोलत होते. प्रारंभी मेळाव्याचे उदघाटन बेळगांव रामकृष्ण मिशनचे सेक्रेटरी स्वामी आत्मपरानंदजी महाराज, स्वामी त्यागीस्वरानंदजी महाराज (दावणगिरी) वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांचे हस्ते करण्यात आले. मेळाव्यात चक्रवर्ती सुलीबेले यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचा समाचार घेतला. ते म्हणाले आजचा युवक मोबाईलच्या फेसबुक व्हाट्सअपमध्ये गुंतून गेलेला दिसत आहे. युवक-युवती मोबाईलच्या नांदी लागून बरबाद होताहेत हे कोठेतरी थांबायला हवे आहे. श्रेष्ठ भारताचे स्वप्न साकारणे साठी युवकांनी शारिरीक मानसिक दृष्ट्या सक्षम बनण्याची आवश्यकता आहे. युवकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या देशप्रेमींंचे स्मरण करायला हवे आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य युवकांच्या हाती असल्याने युवकांमध्ये देशाभिमान जागविण्याचे कार्य आझादी का अमृतमहोत्सव सोहळ्यातून करण्यात आले आहे. श्रेष्ठ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवक सदृढ होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना स्वामी आत्मपरानंदजी महाराज म्हणाले, युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे आचार विचार अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. स्वामी त्यागीस्वरानंदजी महाराज म्हणाले युवकांचे वय उत्तम साधनेसाठी अनुकूल असते. त्याकरिता युवकांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करुन स्वतः घ्या उज्ज्वल भविष्याबरोबर देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगितले.
डाॅ.रमेश दोडभंगी, डॉ. मंदार हावळ, किरण किंवडा, संजय शिरकोळी, मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, श्रीशैल्य सुनदाळे, शिवानंद कमते (सीए), डॉ. संतोष खज्जण्णावर, डॉ. दिपक अंबी, प्रशांत गडकरी, राजू बोरगांवी, महेश दड्डीमनी, डॉ. सुनिल आळतेकर, डॉ कोप्पद, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक नंदू मुडशी, डॉ. जयप्रकाश करजगी, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा.दिगंबर कुलकर्णी अनेक मान्यवर महाविद्यालयाचे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta