संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात नविन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील श्री शंकरलिंग ट्रेडर्सचे मालक आकाश खाडे यांनी सोयाबीन पूजनांने नविन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ केलेला दिसत आहे. संकेश्वरातील शेतकरी अनिल रजपूत यांनी प्रथम सोयाबीन विक्रीचा मान मिळविला आहे. सोयाबीन व्यापारी आकाश खाडे यांनी अनिल रजपूत यांच्या सोयाबीनला प्रति किलो ६० रुपये दर मिळवून दिला आहे. गेल्या चार दिवसांत सोयाबीन दरात आणखी घसलण झालेली दिसत आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आकाश खाडे म्हणाले, आपण अनिल रजपूत यांच्या प्रथम सोयाबीनला प्रति किलो ६० रुपये दर मिळवून दिला आहे. सोयाबीन उत्तम प्रतीचे आहे. उत्पादनात जेमतेम वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
संकेश्वरात नविन सोयाबीनला ६० रुपये दर….
संकेश्वरात सोयाबीन आवक सुरू झाली आहे. पहिल्या सोयाबीनला ६० रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भ्रम निराशा झालेली दिसत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला प्रति किलो ११५ रुपये उच्चांकी दर मिळाल्याने यंदा ८० % शेतकऱ्यांची पहिली पसंत सोयाबीनच राहिलेली दिसत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सोयाबीन आवक सुरू होताच दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta