Tuesday , September 17 2024
Breaking News

हुक्केरीसाठी रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा….

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभेसाठी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचा राजकीय वारसा पुढे खंबीरपणे चालविणेचे कार्य रमेश कत्ती निश्चितपणे करतील असा विश्वास लोकांतून व्यक्त केला जात आहे. राजकारणात‌ रमेश कत्ती हे डॅशिंग लिडर म्हणून ओळखले जातात. ते एक उत्तम वक्ते असून आपल्या प्रभावी भाषणातून लोकांची मने जिंकण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत. उमेश अण्णांच्या विजयात रमेश कत्तींचा सिंहाचा वाटा राहिला आहे. कत्तींचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालविणेचे कार्य ते करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वडील, अण्णा आणि आता तम्मा..
हुक्केरी विधानसभा मतदारसंघावर कत्तींची मजबूत पकड कायम दिसत आहे. आमदार विश्वनाथ कत्ती यांचे विधानसभेत निधन झाल्यानंतर ध्यानी मनी नसताना उमेश कत्ती यांना विधानसभेची पोटनिवडणुक लढवावी लागली. आमदारकी नको म्हणणारे उमेशअण्णा नंतर राजकारणात चांगलेच स्थिरावले. हुक्केरी विधानसभेवर सातत्याने आठ वेळा आमदार आणि चार वेळा मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळविला. मंगळवार दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी तीव्र ह्रदयघाताने उमेश अण्णांची प्राणज्योत मालवली. आता त्यांचा आमदारकीचा वारसदार कोण? याविषयाची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. चर्चेत रमेश कत्ती यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. उमेश अण्णांचे चिरंजीव निखिल कत्ती यांचे नाव देखील चर्चेत आहे. रमेश कत्ती यांची २००९ ते २०१४ चिकोडी लोकसभा सदस्य म्हणून उत्तम कामगिरी राहिले आहे. बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. आता त्यांची राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात एंन्ट्री होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *