Tuesday , March 3 2026
Breaking News

मुत्नाळ येथे बुधवारी सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे किर्तन..

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या मुत्नाळ तालुका गडहिंग्लज येथील एस. डी. हायस्कूल येथे बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै.लक्ष्मीबाई नवलाज यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाम यादव यांनी दिली. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे दिव्य सानिध्य किर्तन कार्यक्रमाला लाभणार असून प्रमुख उपस्थिती खासदार धनंजय महाडिक, घाटगे उद्योग समुहाचे समरजित घाटगे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, नाथाजी पाटील, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, हेमंत कोलेकर उपस्थित राहणार आहेत. किर्तनाचा लाभ संकेश्वर मुत्नाळ भागातील लोकांनी घ्यावा असे एल. टी. नवलाज यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *