हलकर्णी : नांगनूर, ता. गडहिंग्लज येथील नवदुर्गा तरुण मंडळामार्फत नवरात्र उत्सव काळात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन समाजप्रबोधनचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी महाप्रसादचे आयोजन केले आहे. महाप्रसादाच्या प्रारंभी कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाल बाळूमामांची भूमिका साकारणारा समर्थ पाटील उपस्थित रहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश रावण यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta