संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात परंपरागत पद्धतीने विजयदशमी (दसरा) सण भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. खंडेनवमीनिमित्य शस्त्रांचे पूजन करण्यात आले. संकेश्वरकरांनी बुधवारी सायंकाळी पादगुडी येथे श्री बसवेश्वर देवदर्शनांने सिमोल्लंघन केले. पादगुडी येथे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी शमीच्या पानांचे (आपट्यांची पाने) पूजन केले. गावचे खातेदार पाटील कुणालगौडा यांच्या हस्ते शमीची पाने वाटून सोने लुटणेचा कार्यक्रम पार पडला. तदनंतर सर्वांनी एकमेकांना शमीच्या पानांचे वाटप करुन सोनं घ्या सोन्यासारखे रहा. अशा शुभेच्छा प्रदान केल्या. सोने लुटणेच्या कार्यक्रमानंतर पादगुडी येथून श्री शंकराचार्य, श्री दुरदुंडीश्वर, श्री बिरेश्वर, श्री बिरदेव देवांच्या पालखी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावर महिला भक्तगणांनी पंचारती ओवाळून देवदर्शन घेतले. गावातील व्यापारी वर्गाने पालखीचे फटाक्यांच्या आताषबाजीत स्वागत केले. पालखी सेवक म्हणून जगदिश शेट्टीमनी, अप्पासाहेब पाटील, सागर लब्बी, दयानंद शेट्टीमनी, श्रीकांत शेट्टीमनी, महादेव लब्बी, प्रदीप माणगांवी आणि अन्य पालखी सेवकांनी भक्तीपूर्वक सेवा बजावली. पालखी उत्सवात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, नंदू मुडशी, गिरीश कुलकर्णी, चेतन बशेट्टी, आणप्पा संगाई भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी उत्सवाने दसरा सणाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta