Sunday , September 20 2026
Breaking News

माण रस्त्यासाठी जांबोटीत गावकऱ्यांचा रास्तारोको

Spread the love

 

खानापूर : गावाकडे जाणाऱ्या खराब रस्त्याबरोबर चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात माण गावातील ग्रामस्थांनी आज गुरुवारी सकाळी जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. जांबोटी, कणकुंबी व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. जांबोटी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. वन व महसूल अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यानी रास्ता रोको मागे घेण्यात आला.
आज सकाळी जांबोटी सर्कल येथे मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. खानापूर तहसीलदार प्रवीणकुमार जैन, सीपीआय सुरेश शिंगे यांच्यासह वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक अबकारी चेक पोस्टपासून जंगलात असलेल्या मान गावात अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची बैठक झाली. वनाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही नवीन रस्त्याला किंवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वन मंजुरी देता येणार नाही.
“हे प्रकरण उच्च अधिकार्‍यांकडे नेऊन सोडवले जाईल जेणेकरुन गावकऱ्यांना योग्य रस्ता मिळेल आणि चोर्ला रस्ता दुरुस्तीचा विषयही मार्गी लावला जाईल,” असे आश्वासन तहसीलदार जैन यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *