
संकेश्वर : संकेश्वर येथील श्री शंकरलिंग देवस्थान जत्रेनिमित्त अचानक तरुण मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “संकेश्वर श्री–2026”, टॉप–10 व “शंकरलिंग श्री–2026” अंतरतालुका मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. गेल्या सलग ४१ वर्षांपासून या स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून अचानक तरुण मंडळाने शरीरसौष्ठव क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या स्पर्धेत निपाणी येथील धीरज जाधव याने उत्कृष्ट सादरीकरण करत “शंकरलिंग श्री–2026” हा मानाचा किताब पटकावला. संकेश्वर टॉप–10 चा किताब ओमकार चव्हाण याने मिळविला, तर दमदार पोझिंगमुळे “बेस्ट पोझर” हा किताब आदर्श बुडके याने पटकावला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ए. बी. पाटील, आमदार निखिल कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती, श्री. विनय गौडा पाटील, युवा नेते श्री. सुभाष बाबुराव कासरकर व श्री. राजू चिदानंद बोरागावी उपस्थित होते.
स्पर्धांचे परीक्षण राजेश लोहार, अनिल अंबरोळे, सुनील चौधरी, भारत बाळेकुंद्री, नारायण चौगुले, बाबू पावशे व श्रीधर बारटक्के यांनी केले. स्टेज मार्शल म्हणून राजू पाटील व अनिल किलेकर यांनी जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेला मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवप्रेमी, तरुण वर्ग व नागरिकांनी उपस्थिती लावून स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले.

Belgaum Varta Belgaum Varta