Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव शहरात बेकायदेशीर लेआऊटवरून वाद; नाल्यालगत झाडतोड व रस्ता बांधकाम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील समर्थनगर येथील सर्व्हे नं. 403/1 आणि 403/2 परिसरात बेकायदेशीर लेआऊट उभारणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाल्यालगत झाडतोड करून रस्ता बांधल्याचा आरोप टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी मधील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या बांधकामामुळे संबंधित नाल्याची रुंदी कमी होत असून, आगामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी तसेच दूषित पाणी आजूबाजूच्या नागरिकांच्या घरी घुसण्याचे दाट शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर लेआऊट कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी न घेता उभारण्यात येत असल्याचा आरोप असून, यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आज पुन्हा या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी विरोध नोंदवला.
या प्रकरणी एप्रिल 2025 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार (इनवर्ड) देण्यात आली होती. मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे बेकायदेशीर लेआऊट तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *