Tuesday , April 7 2026
Breaking News

सलामवाडी येथे श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रेचे आयोजन

Spread the love

 

दड्डी (वार्ताहर) : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हालसिद्धेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवार दि. 11 एप्रिल 2026 पासून रविवार दि. 12 एप्रिल 2026 पर्यंत मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता पाणी भरणे व मंडप घालणे या कार्यक्रमांनी सुरुवात होणार आहे. रात्री 9 वाजता श्री भावेश्वरी देवी पालखीचे आगमन होणार असून, त्यानंतर भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक गाणी व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रविवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पालखीचे श्री भावेश्वरी देवी मंदिराकडे आगमन होऊन देवीचे पूजन व गाणी सादर करण्यात येतील. त्यानंतर गावामध्ये पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

यात्रेच्या निमित्ताने सायंकाळी 4 वाजता ओपन मेंढा टक्कर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 10,001 रुपये, द्वितीय 7,001 रुपये, तृतीय 5,001 रुपये, चतुर्थ 3,001 रुपये व पाचवा क्रमांकासाठी 2,001 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश फी 701 रुपये ठेवण्यात आली आहे.

या यात्रेसाठी ग्रामस्थ मंडळ, श्री हालसिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व मुंबई मंडळ यांच्या वतीने तयारी करण्यात आली असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मोदगा भावेश्वरी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक

Spread the love  दड्डी : मोदगा (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी यात्रेनिमित्त नियोजन बैठक बोलावण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *