संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंबिका नगरमध्ये ग्रामदैवत श्री शंकरलिंग यात्रेनिमित्त आयोजित गोंधळी प्रिमिअर लिंग हाफपिच क्रिकेट सामन्यांचे पहिले बक्षिस 7777 रुपये व ट्रॉफी युके-77 सघाने पटकाविली. सामन्यात पाच क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामना अत्यंत चुरशीने झाला. सामन्यात ए. जे. वारिअर्सला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सदर संघाला रोख 5555 रुपये व चषक तर तिसर्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविणार्या साईराज चँलेंजर्स संघाला रोख 3333 रुपये व चषक देण्यात आले. विजेत्यांना बक्षिसे तानाजी कळीवाले, देवदास भोसले, दत्ता दवडते, शंकर काळे, रामचंद्र भोसले, हरिभाऊ आडेकर, महेश दवडते, दीपक सुगते यांच्या हस्ते देण्यात आली. सामन्याचे निर्णायक म्हणून दिपक दवडते, राजू आडेकर, अमोल अटक, संजय आडेकर, यशपाल कळीवाले, विनायक दवडते, कृष्णा दवडते यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta