संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील महालक्ष्मी मंदिर मैदानावर नुकतेच संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेनिमित्त ठगरांंच्या टक्करीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ठगरांच्या टक्करीला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून चालना दिली. ठगरांच्या टक्करीची स्पर्धा तशी लक्षवेधी ठरली. कारण स्पर्धेत एकापेक्षा एक जातीवंत सदृढ ठगर लोकांना पहावयास मिळाले. स्पर्धा चार गटांत घेण्यात आली. जनरल गटाचे पहिले बक्षिस सिध्देश्वर प्रसन्न (सोलापूर) या ठगरांने पटकाविले. दुसरे बक्षिस गब्बर (जिगरहावळी), तिसरे बक्षिस हालसिध्देश्वर प्रसन्न (सारापूर) यांनी पटकाविले. कनिष्ठ गट (दोन दाती ठगर) पहिले बक्षिस जयहनुमान (वडरहट्टी), दुसरे बक्षिस करेम्मा देवी प्रसन्न (सुंठरघाळी धारवाड), तिसरे बक्षिस लक्ष्मीदेवी प्रसन्न (मसरगुप्पी). चार दाती ठगर स्पर्धेचे पहिले बक्षिस मुत्तू (धारवाड), दुसरे बक्षिस श्री मुत्तूकोडी बिरेश्वर प्रसन्न (वडगोल), तिसरे बक्षिस श्री महालक्ष्मी प्रसन्न (कडलगे). सहा दाती ठगरांच्या टक्करीचे पहिले बक्षिस रवळनाथ प्रसन्न (पिळगांव), दुसरे बक्षिस सोमेश्वर प्रसन्न (नागरमनोळी), तिसरे बक्षिस वनमॅन आर्मी (चिगडोळी) यांना देण्यात आले. विजेत्यांना बक्षिसे प्रमुख पाहुणे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, राजेंद्र पाटील, श्रीकांत हतनुरी, सुनिल पर्वतराव, संजय शिरकोळी, बसवाणी कर्देगौडा, महेश देसाई, अजित करजगी, पैलवान अप्पासाहेब कर्देण्णावर, संतोष मुडशी, सुरेश शेट्टीमनी, संतोष कमनुरी, सुभाष कासारकर, जयप्रकाश सावंत, प्रदीप माणगांवी आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
ठगरांची टक्कर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचकमिटीचे प्रदीप कर्देगौडा, नितिन शेट्टीमनी, मल्लीकार्जुन यळोती, गजू मोकाशी, ओंकार लब्बी, विजय काकोळी, रमेश अक्कीवाटे, सचिन पचंडी, प्रविण कर्देगौडा, आकाश खाडे, ओंकार मन्यागोळ, योगेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.