
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नेहरु रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटस दुकानाचे उद्धघाटन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी फित सोडून केले. यावेळी श्रींची पादपूजा शुभंम बागलकोटी यांनी केली. उपस्थितांचे स्वागत बसवराज बागलकोटी यांनी केले. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, शिवानंद संसुध्दी, डॉ. टी.एस.नेसरी, के.के.मुळे, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, गजानन क्वळी, रवि पलसे, अभिजित कुरणकर, प्रकाश फडी, अरुण गड्डी, उदय पट्टणशेट्टी, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, अरविंद केस्ती, पुष्पराज माने, नितिन पलसे, राजेश गायकवाड अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शंकर बागलकोटी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta