Monday , December 23 2024
Breaking News

अपहरण प्रकरणी भवानी रेवण्णा यांना एसआयटीची नोटीस

Spread the love

 

बंगळुरू : केआर नगर महिला अपहरण प्रकरणात आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी रेवण्णा अडचणीत सापडल्या असून एसआयटीने त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
एसआयटीने यापूर्वी भवानी रेवण्णा यांना दोनदा नोटीस बजावली होती. अटकेचा सामना करत असलेल्या भवानी रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. भवानी रेवण्णा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज आदेश दिला जाणार आहे. यानंतर एसआयटीने भवानी रेवण्णा यांना सुनावणीला हजर राहण्यासाठी दुसरी नोटीस बजावली. भवानी रेवण्णा यांनी पत्र लिहून घरी येऊन चौकशी करण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास घरी येऊन चौकशी करू, असे सांगणारी एसआयटी उद्या भवानी रेवण्णा यांच्या होलेनरसीपूर येथील निवासस्थानी चौकशी करणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *