बंगळुरू : अभिनेता चॅलेंजिंग स्टार दर्शनला अटक करण्यात आली आहे. पवित्रा गौडा यांना अश्लिल मेसेज पाठवल्यामुळे रेणुका स्वामी यांची हत्या करण्यात आली होती. अभिनेता दर्शनच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अभिनेता दर्शनला म्हैसूर येथील फार्महाऊसमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पवित्रा गौडा यांनी दर्शनासोबतचे इरो फोटो शेअर केले आहेत. चित्रदुर्गातील रेणुका स्वामी यांनी पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज पाठवले. रेणुका स्वामी यांची कामाक्षिपालयात हत्या झाली होती. चारही आरोपींनी दर्शनच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली आहे. घटनेच्या वेळी दर्शनही तेथेच असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दर्शनसह 10 जणांना अटक करण्यात आली आहे.