Wednesday , March 4 2026
Breaking News

उत्तर कन्नडमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून 7 जणांचा मृत्यू

Spread the love

 

अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक भीषण दुर्घटना घडली असून डोंगर कोसळून ७ मजूर चिखलात अडकल्याची घटना शिरूरजवळ घडली आहे. अंकोला तालुक्यातील शिरूरजवळील राष्ट्रीय महामार्गालगत ही दुर्घटना घडली असून अजूनही अनेक लोक चिखलाखाली अडकल्याचा संशय आहे. अपघातावेळी कामात गुंतलेले लॉरी आणि टँकर नदीत वाहून गेले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 66 वर आयआरडी कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या टेकडीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले होते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *