बेंगळुरू : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानुसार आता राज्यात लागू केलेला विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तज्ञ समितीशी झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लोकांना त्रास होईल, असा लॉकडाऊन गरजेचा नाही; पण दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करणे अनिवार्य आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta