बंगळुरू : मागासवर्गीय आणि दलित आणि शोषित समुदायांच्या स्वामीजींच्या संघाने आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कावेरी निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना बिनशर्त नैतिक पाठिंबा जाहीर केला.
केंद्र सरकार आणि राजभवनातून सरकार अस्थिर करण्याच्या कारस्थानाचा स्वामीजींनी तीव्र शब्दात निषेध केला आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वतीने या षडयंत्राविरुद्ध लढा देण्याची घोषणा केली.
येथील शिष्टमंडळात निरंजन नंदपुरी महास्वामीजी, शांतवीर महास्वामी, सिद्धरामेश्वर स्वामी, बसवमूर्ती मादार चन्नय्या महास्वामी रेणुकानंद स्वामी, बसवा मच्छिदेव महास्वामी हे, अन्नदानी भारती अप्पाण्णा स्वामी, शांतम्मया स्वामीजी यांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta