Sunday , July 26 2026
Breaking News

इस्कॉन मंदिरातील सोमवार व मंगळवारचे कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांमृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त सोमवार व मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

26ऑगस्ट रोजी जन्माष्टमी
सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4.30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला आदी कार्यक्रम होणार आहेत. पपू भक्तीरसामृत स्वामी महाराज श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहेत. त्यानंतर रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

27 रोजी श्रील प्रभूपाद व्यासपूजा महोत्सव
जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प.पू.श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरात सकाळी दहा वाजता श्रीद प्रभुपाद गौरव, साडेअकरा वाजता अभिषेक, साडेबारा वाजता पुष्पांजली व गुरुवंदना आदि कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्तांची भाषणे होतील. तसेच भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *