Sunday , July 26 2026
Breaking News

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळेत निपाणीतील दोन शिक्षकांचा सहभाग

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील ‘हॉल ऑफ सायन्स’ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री येथे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेचे शिक्षक सलीम नदाफ आणि भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलचे शिक्षक दिलीप शेवाळे यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत देश विदेशातील
माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. थायलंड मलेशिया हॉंगकॉंग येथील तज्ञांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न पुरस्कार प्राप्त वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक सी. एन. आर. राव उपस्थित होते. प्रशिक्षणार्थ्यांना सी. एन. आर. राव हॉल ऑफ सायन्स या गॅलरीला भेट देण्याची संधी मिळाली. गॅलरीला भेट दिल्यामुळे त्यांनी लावलेले विविध शोध तसेच त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे प्रत्यक्ष पाहण्याचा योग प्राप्त झाला.
सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्यामध्ये रासायनिक प्रयोगशाळेतील प्रयोगांचा अभाव तसेच मोठ्या प्रमाणात पर्यावरणामध्ये होणाऱ्या विषारी रसायनांचा शिरकाव, प्रदूषण ‘रासायनिक धोके, वापर, मर्यादा त्यावर होणारा अति खर्च या सर्वांमधून विद्यार्थ्यांना सूक्ष्म पातळीवर सुरक्षित प्रयोग शाळेमध्ये प्रयोग करून त्यांची रसायन शास्त्रामधील सक्ती वाढावी, त्याचे महत्त्व समजावे व अध्ययन अतिशय सुरळीत व्हावे, यासाठी अनेक प्रयोगांचे सूक्ष्म स्तरावर नियोजन करण्यात आले होते. सहभागी शिक्षकांना प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे किट केमिकल सोसायटी ऑफ थायलंडचे अध्यक्ष डॉ. विधीचाई पारसुक यांच्या हस्ते देण्यात आले. प्रशिक्षणासाठी भारतातील १०० विज्ञान शिक्षकांची निवड करण्यात आली होती. प्रा. सुफा हन्नोनगुब्बु यांच्या नेतृत्वाखालील टीमने भारतातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
—-

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *